रोह्यात राहत्या घरात महिलेची स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या!

रोहा (समीर बामुगडे) : रोह्यातील भुवनेश्वर मध्ये राहत्या घरात महिलेने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्पना नारायण ठाकुर (वय वर्ष 55) रा. भुवनेश्वर-रोहा येथील श्रीरंग रेसिडेन्सी, समर्थ नगरमध्ये राहणारी असून ती मूळ राहणार पेणची असून आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 

प्राथमिक माहिती नुसार, सदर महिला ही श्रीरंग रेसिडेन्सी मध्ये  तिसऱ्या मजल्यावर राहत असून  घराच्या  बाथरूम मध्ये स्वतःला जाळून घेऊन तिने आत्महत्या केली. पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री. नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Popular posts from this blog