महाराष्ट्रात गुटखा विक्रीची बंदी शिथील करण्याची मागणी?
रोहा (समीर बामुगडे) : महाराष्ट्र राज्य शासनाने गुटखा बंदी राज्यात कायदा पारित केला असतानादेखील खेड्यापाड्यात व शहरात गुटखा विक्री चढ्या भावाने छुपी विक्री जोरात सुरु असून टपरीवाले व जनरल स्टोअर्समध्ये विक्री सुर असतना अशा प्रकारे कायदा धाब्यावर बसवून गोरख धंदा जोरात करताना दिसत आहेत. तर गुटखा विक्री ही शहरातून खेडयापर्यंत पोहचली जात असून या प्रकाराकडे शासनाचे दोन विभागाकडून दुर्लक्ष केला जात आहे. तसेच गुटखा माफिया हे म्हणतात की, आम्ही या दोन विभागात मलिदा देतो म्हणून आम्ही कारवाईला घाबरत नाही. त्याचे कारण या संबंधित विभागाकडे पाकीटे गेली असतात. यामुळे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून त्याच्यावर शासनाने कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. गुटखा विक्रीचा गोरख धंदा कायदा पायदळी तुडवत शासनाचा अपमान करत आहे. तसेच या दोन विभागातील अधिकारी मलई खात असतील तर गुटखा खाणाऱ्याने शासनाकडे गुटख्याची खुलेआम विक्रीची मागणी होत आहे. या मागणी नुसार शासनाने महाराष्ट्र राज्याचा फायदा करुन घ्यावे यामुळे या संबंधित विभाग कारवाई शुन्य दाखवते आणि अधिकारी स्वतःच मलईवर डल्ला मारतो सध्या चुप्पी गुटखा विक्री चालू असून त्यामध्ये अधिकारी सेटींग करुन विषय बंद करीत आहेत. या प्रकाराकडे शासनाने गुटखा निर्मिती केद्र प्रथम बंद करावे अशी मागणी नागरिकांडून केली जात असून गुटखा विक्रीला चाप बसवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.