एस.एस.सी. परीक्षेत श्री. दिनेशभाई मोरे शिक्षण संस्थेचा १०० टक्के निकाल
रोहा (समीर बामुगडे) : दिनेशभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव-यशवंतखार या शिक्षण संस्थेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत यावर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
श्री. दिनेशभाई मोरे शिक्षण संस्थेचे सानेगुरूजी विद्या निकेतन सानेगाव, सर्वोदय विद्यालय सुडकोली, कृष्णा संभाजी गोरीवली माध्यमिक विद्यालय तिसे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आरे, महात्मा गांधी विद्यालय तिसे या सर्व शाळांचा एस.एस.सी. चा निकाल यावर्षीही १००% लागला. त्यामध्ये सर्वोदय विद्यालय सुडकोली या शाळेत प्रीथम जय दत्ताराम पाटील ९०.४०%, द्वितीय हर्षद हरिदास भुरे ८१%, प्रेरणा सुरेश मोरे ८०.२०% अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
श्री. दिनेशभाई मोरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार नामदेव म्हात्रे यांनी संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.