प्राध्यापक अजित शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने विद्यार्थी वर्ग हळहळला!
...शेवटी इतिहास अर्धवटच राहिला ना सर !
माणगांव (प्रमोद जाधव) : माणगांव मधील अशोकदादा साबळे ज्युनियर कॉलेज माणगांव मधील इतिहास विषयाचे प्राध्यापक अजित शिंदे सर यांची निधनवार्ता माणगांव तालुक्यात १६ जुलै रोजी समजताच माणगांव तालुक्यावर एकच शोककळा पसरली. अर्धवट आयुष्यातच अजित शिंदे यांच्या जाण्याने त्यांचा विद्यार्थी वर्ग देखील हळहळला. अजित शिंदे हे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. माणगाव तालुक्यात या दिवशी सोशल मीडियावर "शेवटी इतिहास अर्धवटच राहिला ना सर!" अशा शब्दात शब्दपुष्प श्रद्धांजली अनेक नागरिकांनी अर्पण केली.
शिंदे यांच्या आजाराबाबत समजताच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी दूरध्वनी वर संपर्क करत मुंबई मधील अंधेरी येथील एका नामांकित रुग्णालयात दाखल करून घेतले मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आले नाही आणि १६ जुलै रोजी पहाटे सरांची प्राणज्योत मालवली.अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, सतत हसरा चेहरा,चेहऱ्यावरील दुःख नेहमी झाकणे,अध्यात्माचे वेड,नानासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री समर्थ बैठकीचे निरूपण सदस्य अशी अजित शिंदे यांची ओळख होती.
अजित शिंदे यांचे मुळगाव माणगांव तालुक्यातील उणेगाव वडील विद्युत वितरण कर्मचारी सेवानिवृत्त त्यांचेही मागील आठवड्यात निधन उत्तरकार्य होतो नाच ते अजित शिंदे यांचे निधन यामुळे उणेगाव मधील शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,प्राध्यापक अजित शिंदे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. ईश्वर या परिवाराला दुःखातून सावरण्यास मदत करो असे बोल माणगाव बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहेत.