पोस्को स्टील कंपनी बाहेरील गुंडगिरी विरोधातील स्थानिक भूमिपुत्रांचे उपोषण विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मध्यस्थीने मागे

गुंडगिरी खपवून घेणार नाही, वेळ पडल्यास केंद्रातून सूत्रे हलविणार - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

माणगांव (प्रमोद जाधव) : माणगांव तालुक्यातील विळे भागाड एम आय डी सी परिसरात असणाऱ्या पोस्को महाराष्ट्र स्टील या कंपनीच्या भंगार उचलण्याच्या वादावरून गेले दीड ते दोन महिने वाद सुरू आहेत. अशामध्ये भंगार वाहतूक होऊ न देणे, भंगार वाहतुकीच्या गाड्या फोडणे, पंक्चर करून नुकसान करणे अशा प्रकारच्या घटना रात्री अपरात्री देखील घडत असल्याने या सर्व गोष्टी घडविणाऱ्या विषयी सक्त कारवाई करण्यात यावी. यांसारख्या असंख्य मागण्या समोर ठेवून ग्रामपंचायत भागाड सरपंच प्रकाश जंगम, विळे वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे, शिवसेना अवजड वाहतुक सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उतेकर, एस पी लॉजीस्टिकचे मालक संतोष पोळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपुत्र १२ जुलै पासून माणगांव पोलीस ठाण्याच्या बाहेर आमरण उपोषणाला बसले होते. जोपर्यंत स्थानिकांवर अन्याय करणाऱ्यांवर प्रशासन कडक कारवाई करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे स्थानिक उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते

या उपोषणाला दुसऱ्या दिवशी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व प्रविण दरेकर यांच्या मध्यस्थीने पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. यावेळी प्रविण दरेकर यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सचिव रवि मुंढे,भाजप रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष तथा माणगांव तालुका अध्यक्ष संजय (आप्पा) ढवळे व भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते यांनी सत्तेच्या जोरावर स्थानिक भूमिपुत्रांवर गुंडगिरी दाखवून कष्टाची भाकरी हिसकाऊ पाहणाऱ्या लोकांचा देखील खरपूस समाचार घेतला. यानंतर प्रवीण दरेकर यांनी माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांची भेट घेऊन सदर प्रकरणी आवश्यक त्या सूचना दिल्या.

गाड्यांची तोड-फोड करून जी दहशत निर्माण केली जात आहे त्यांच्यावर कडक कलमे लावून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, स्थानिक एस पी लॉजीस्टिक कंपनी चा व स्थनिकांचा रोजगार राजकिय दबावापोटी बंद करण्यात आला तो चालू करण्यात यावा, पोस्को कंपनी बाहेर जो बेकायदेशीर जमाव जमा होतो त्याकरिता विशेष पोलीस पथकाची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी,बाहेरील गुंड प्रवृत्ती चे लोक येऊन स्थानिक लोकांना दमदाटी करून दहशत निर्माण केली जात आहे त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात या प्रमुख मागण्या स्थानिक भूमिपुत्रांच्या उपोषणामध्ये होत्या.


आपण संविधानिक मार्गानी उपोषण केलेत त्याबद्दल तुमचे आभारी आहे आणि तो तुमचा घटनात्मक अधिकार देखील आहे. ज्या प्रकल्पात तुमच्या जमिनी गेल्या त्या ठिकाणी तुम्हाला रोजगार मिळणे गरजेचे आहे आणि त्या रोजगारावर कोणी घाला घालत असेल तर आता शांत बसू नका उपोषणाला अरे ला का रे उत्तर द्या, आणि असे आता शांत बसण्याची वेळ नाही या संदर्भात मी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या देखील चर्चा केली आहे, त्यावेळी स्थानिकांवर अन्याय होत असेल तर,  राज्यातील सत्तेच्याबळावर ठराविक पक्षाचे येथील लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बगलबच्चे गुंडगिरी दाखवून स्थानिकांची रोजी रोटी हिसकावून घेत असतील हा मुद्दा आम्ही जिल्हा पातळी राज्य पातळी व वेळ पडल्यास केंद्र स्तरावर उचलून धरू आणि स्थनिकाना न्याय मिळवून देऊ! 

- प्रवीण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते


सदर प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यास, काही बाबी अपूर्ण राहिल्या असल्याने अडचणी निर्माण होत होत्या मात्र १२ जुलै रोजी तक्रादार यांच्या कडून त्या बाबी पूर्ण करण्यात आल्या यावरून बेकायदा जमाव जमवून भंगार वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे ड्रायव्हर यांना धमकावून शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, गाड्यांचे नुकसान करणे, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणे या प्रकरणी निजामपूर विभागातील नावे माहिती असलेल्या एकूण ३० व इतर ५० जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु.र.नं. १६९/२०२१ भा. दं. वि. क. ३४१, १४३, १४९, १८८, २६९, २८०, ५०४, ४२७, ५०६ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.स.ई. अनिल करे करीत आहेत.

- अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक माणगांव पोलीस ठाणे

Popular posts from this blog