खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे यांचा पुढाकार

रोहा (रविना मालुसरे) : रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांचा वाढदिवस दहा जुलै रोजी रोहे तालुक्यात जल्लोषात साजरा करण्यात आला. कोकणचे लोकनेते म्हणून ख्यातीप्राप्त खासदार सुनिल तटकरे यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी पर्वणीच असते! संपूर्ण रोहे तालुक्यात साहेबांचा वाढदिवस गावा-गावात सणाच्या स्वरूपात साजरा केला जातो. गावांच्या बाहेर आणि नाक्यानाक्यांवर साहेबांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकत होते.

वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम शासकीय विश्रामगृह रोहा येथे पार पडला. सकाळी ठिक दहा वाजून दहा मिनिटांनी कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला केक कापून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी रोहा पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सपकाळ, रोहा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयवंत दादा मुंडे, रोहा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अमित मोहिते, संतोष भोईर, सतिश भगत, उद्देश देवधरकर, महेश बामुगडे, रामा नाकती, सतेज आपणकर, विनीत वाकडे, संतोष पार्टे, दिपक कडू, स्वप्नील धनावडे, मंगेश देवकर, अमोल बाकडे, मयुर मुंढे, शशिकांत शेळके, अमोल टेमकर, ज्ञानु कोळी, दिपक कडू, उत्तम म्हसकर, निलेश शिर्के, महेश मोरे, कोलटकर, सर्फराज बांदोडकर, पप्पू सरवणकर, प्रथमेश, मांज सवाल, विनायक सपकाळ, अतिष पडवळ, नितीन कोल्हटकर, अंतोष शिर्के, राकेश महामुनी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमानंतर रोहा पोलीस स्टेशनला शुद्ध पेयजल संयत्र भेट स्वरुपात देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog