सुदर्शन केमिकल्स कंपनीचा स्तुत्य उपक्रम
खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांचे लसीकरण
रोहा (रविना मालुसरे) : रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुदर्शन केमिकल्स कंपनीकडून महिलांचे लसीकरण करण्यात आले.
सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आणि स्थानिक जनतेबरोबर आपुलकीचे नाते जोपासणाऱ्या सुदर्शन केमिकल्सने कोरोना काळात स्थानिकांना आधार दिला. कामगार व कामगारांच्या कुटुंबियांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाची मोहिम कंपनीच्यावतीने राबविली जात आहे. नुकतेच २१जून रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा पालक मंत्री ना. अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धाटाव परिसरातील महिलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष प्रितम पाटील, रविना मालुसरे सारिका खंडागळे तसेच कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट श्री विवेक गर्ग, एडमिन व सी एस आर हेड माधुरी सणस, एडमिन एक्झिक्यूटिव्ह श्री रविकांत दिघे, एडवोकेट विशाल घोरपडे, सी एस आर एक्झिक्यूटिव्ह रुपेश मार्बते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.