या बाहुउद्देशीय प्रकल्पातून प्रबोधनाचे कार्य घडेल! 

- ना. धनंजय मुंडे 

माणगांव (उत्तम तांबे) : माणगांव तालुक्यातील गोरेगाव येथे भारतरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक स्थापन करण्याबाबत बैठकीचे आयोजन सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीस खासदार सुनिल तटकरे साहेबांसमवेत उपस्थित राहिले.

श्रीवर्धन राज्यमार्गाला लागून असलेल्या मौजे गोरेगाव येथे पंचशिल बौद्धजन सेवासंघाच्या जागेत १९८५ साली संस्थेची इमारत उभारण्यात आली होती. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. अशा या ऐतिहासिक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारुन बहुद्देशीय इमारत बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम संस्थेमार्फत पूर्ण झाले असून उर्वरित इमारत बांधकामाकरीता अनुदान मिळण्याबाबत संस्थेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

या बहुद्देशीय स्मारक व इमारतीसाठी नव्या आराखड्यानुसार वाढीव रक्कम भरण्यात येणार आहे. या बहुद्देशीय प्रकल्पातून सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. शाम दागडे, सह सचिव श्री. दि. रा. डिंगळे, अवर सचिव श्री. अ.कों. अहिरे, पंचशील बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष श्री. विकास गायकवाड, संघाचे सचिव श्री. संदिप जनार्दन साळवी, श्री. बापू सोनगिरे व संबधित अधिकारी  उपस्थित होते.

Popular posts from this blog