बोरिवली ठाणे कोलाड कुडली मार्गे भिरा एसटी बस सेवा सुरू

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा पर्यंत कोलाड वरून एकही एसटी बस धावत नव्हती फक्त एक टपाल एसटी बस सकाळी 9 वा. रोहातून सुटून ती भिरा येथे 10.30 वा. पोहोचायची. लॉकडाऊनच्या काळात ती सुद्धा बंद होती.

लॉकडाऊन शिथिल होताच रोह्यातून सुटणारी एसटी बस बंद होऊन त्याऐवजी बोरिवली (कोलाड, कुडली) मार्गे भिरा एसटी बस सुरू झाली असून सदर बस बोरिवलीतुन स. 6 वा. सुटते व ती स. 11 वा. भिरा येथे पोहचते. सदर एसटी बस बोरिवली, ठाणे, पनवेल, पेण, कोलाड, सुतार वाडी, कुडली, विळे, पाटणूस भिरा अशी मार्गक्रमण करीत असल्याने यादरम्यान येणाऱ्या अन्य गावांतील प्रवाशांना देखील मुंबई ठाण्यातून येणाऱ्या या एसटी बसचा खूप फायदा झाला आहे. एवढंच नाही तर सदर बस भिरा येथून परतीचा प्रवास करताना 2.30 वा. सुटते व बोरिवली येथे रा. 9 वा. पोहचते. त्या मुळे ही एसटी बस सुरू रहावी असे वाटत असेल तर यागावांच्या दरम्यान येणाऱ्या प्रवाश्यांनी जास्तीत जास्त प्रवास करावा म्हणजे ही बस कायम करता येईल अशी माहिती बोरिवलीचे आगार प्रमुख समीर सरफळे यांनी दिली. शिवाय या एसटी बस ला भरघोस प्रतिसाद जर मिळालाच तर बोरिवली, ठाणे (कोलाड, कुडली) मार्गे भिरा ही रातराणी एसटी बस सुद्धा सुरू करता येईल असेही आगार प्रमुखांनी सांगितले. प्रवाशांना अधिक माहिती हवी असल्यास कृपया त्यांनी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रवीण रानावडे मो. नं. 9890402686, गुलाब नलावडे मो. नं. 8879817245, समीर सरफळे मो. नं. 7776992182, कोलाड मार्गे बोरिवली ठाणे भिरा बस सुरू झाल्याने या परिसरातील ग्रामस्थ, प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

विळे ग्रामस्थांनी याबाबत थासदार सुनील तटकरे व पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे कोलाड मार्गे सदर एसटी बस सुरू करण्याची मागणी केली होती व त्यानुसार ग्रामस्थांची मागणी मान्य होऊन एसटी बस सुरू करण्यात आली आहे.

Popular posts from this blog