साई येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दुकानदारांना नोटीस
मास्क न लावणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
साई (हरेश मोरे) : माणगांव तालुक्यातील साई ग्रामपंचायत हद्दीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 जून रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गावातील प्रमुख व्यक्ती यांना निमंत्रित करण्यात आले होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून या सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी साई ग्रामपंचायतिचे सरपंच हुसेनभाई रहाटविलकर यांनी कोरोना होऊन मृत्यू झालेल्या लोकांना सर्व उपस्थित यांच्या समवेत श्रद्धांजली वाहिली.
त्यावेळी सरपंच हुसैन रहाटविलकर यांनी कोरोना संदर्भात कशा प्रकारे काळजी घ्यायची याबाबत माहिती दिली. तसेच तिसरी लाट कशी रोखयची याबाबत लोकांना मार्गदर्शन केले. तसेच साई परिसरात असणाऱ्या दुकानदारांना नोटीस काढून त्यांना सूचना देण्यात आल्या. दुकानदारांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास दंड वसूल केला जाईल, तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच हुसैन रहाटविलकर, उपसरपंच प्रकाश धुमाळ, ग्रामविकास अधिकारी तेटगुरे, सदस्य हानीफ खेरटकर, सौ. अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते विठोबा मोरे, गफहार रहाटविलकर, सर्व गावातील प्रमुख व्यक्ती, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते