स्वराज्य सह्याद्री ग्रुप माणगांव तर्फे "एक हात मदतीचा"
माणगांव (सचिन पवार) : रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नुकताच झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड येथे महापूर व तळई गाव हे दरड कोसळून संपूर्ण जमीनदोस्त झाले असून महाड बाजारपेठेत तर 20 फूट पाणी शिरल्याने सर्वत्र महाड शहर तसेच नदीकाठी असलेल्या गावांचे नुकसान झाले आहे.
22 जुलै रोजी पासून महाड मधील नागरिक हे मोठया संकटात सापडले असताना त्यांच्या मदतीला स्वराज्य सह्याद्री ग्रुप माणगांव या ग्रुपने एक हात मदतीचा देत पुढाकार घेतला आहे.
या वेळेस माणगांव तालुक्यातील सर्व नवतरुण युवा यांनी एकत्र येवून खुप मेहनत घेतली आहे.यावेळेस ज्या ज्या ठिकाणी मदत होईल त्या त्या ठिकाणी जाऊन नवतरुण युवा ने बिस्कीट, पाणी बॉक्स, फरसाण अश्या प्रकारे खाऊ वाटप केले त्या वेळी स्वराज्य सह्याद्री ग्रुप चे संस्थापक अद्यक्ष तसेच सर्व शिवमावले यांनी अनमोल वेळ देऊन लोकांची घरपोच जाऊन सेवा केली आहे.यावेळेस सचिन पवार, अक्षय खरुसे, अजय पाठक, प्रदीप पवार, गणेश वागलेकर, सुमित पवार, सतीश पवार, अभी लागे, निलेश महाडिक, तसेच सर्व शिवमावळे उपस्तीत होते.