रायगड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची "झूम व्हिडीयो" सभा यशस्वी संपन्न

रोहे शहर (समीर बामुगडे) : ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून ते आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी कार्यकर्ते आक्रमक पवित्र्यात आले आहेत, हे आरक्षण अबाधित राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उठाव करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी जनमोर्मा कोकण विभाग अंतर्गत ओबीसी संघर्ष सन्मवय समिती रायगड जिल्ह्याची संयुक्तपणे झूम विडीयो मिटिंग सोमवार 14 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती या सभेला रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ओबीसींचे स्थानिक स्वराज्यसंस्था मधिल आरक्षण वाचविणे व त्या संदर्भात लाखोंच्या संख्येने ई-मेल पाठवून सोशल मीडिया आंदोलन चालविणे. पदोन्नतीत ओबीसींना आरक्षण मिळविणे बाबत आंदोलन. केंद्र सरकार ओबीसींची जर जातवार जनगणना करीत असेल तर राज्य सरकारने जातवार जनगणना करणे. ओबीसी आंदोलनाची पुढील  दिशा ठरविणे. अशा विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सभेला प्रचंड संख्येने युवा वर्ग तसेच जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. या मिटिंगमध्ये ओबीसीसह सर्व मागासवर्गावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना लाखोंच्या संख्येने E-mail पत्र पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या सभेला प्रामुख्याने, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष अण्णाभाऊ शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, तसेच अरविंद डाफळे (सरचिटणीस), श्री. कृष्णा वणे (सचिव), समन्वयक माधव कांबळे उपस्थित होते. रायगड जिल्हा ओबीसी जनमोर्चाचे उदय कठे, (रायगड जिल्हा समन्वयक), शंकरराव म्हसकर (सल्लागार) डॉ. प्रा. राजेश शिगवण (जिल्हा समन्वयक), रोशन पाटील (युवा समन्वयक), प्रा. माधव आगरी, महेश शिर्के, अनंत गवळकर, अरुण चाळके (अध्यक्ष-माणगाव), सुरेश मगर अध्यक्ष-रोहा), सचिन कदम (अध्यक्ष-तळा) तसेच अॅड. मंगेश हुमणे, अशोक करंजे आणि सहकारी उपस्थित होते. 


Popular posts from this blog