ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राज्यात ओबीसी राज्यव्यापी निदर्शने आंदोलन
रोहा (समीर बामुगडे) : ओबीसी राज्यव्यापी निदर्शने आंदोलन महाराष्ट्रातील सर्वत्र ३५८ तहसीलदार कचेरी समोर ‘ओबीसी आक्रोश आंदोलन’ संपन्न झाले. ओबीसी जनमोर्चा-महाराष्ट्राचे
अध्यक्ष प्रकाश अण्णा शेडगे यांनी सर्व ओबीसी प्रमुख पदाधिकारी वर्गासह समाजबांधव यांना केले होते. ओबीसी संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकात बावकर यांनी देत सर्व तालुकास्तरावर हे निदर्शने आंदोलन झाल्याचे सांगितले. दरम्यान, ओबीसी समाज बांधवांकडून रोहा तहसिल कार्यालयाकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कोर्टाकडून रद्द झाल्याने व पदोन्नतीमधील आरक्षणही राज्य सरकारने रद्द केले आहे तसेच ओबीसी जातवार जनगणना, सरकारी पदोन्नती आरक्षण बाबत ओबीसी जनमोर्च्याच्या वतीने सर्व होणारी आंदोलने संपन्न झाली.
यामध्ये ओबीसीतील कुणबी, भंडारी, आगरी, लोहार, तेली, नाभिक, कोळी, धनगर, कुंभार, माळी, वंजारी, सोनार, साळी, कोष्टी, भावसार, वाणी, शिंपी, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, लोहार, शिंपी, बंजारा, गवळी, डोंबारी तसेच व्हीजेएनटी, एसबीसी या वर्गातील बांधवांनी सहभागी होऊन तहसील कचेरी समोर निदर्शने करून सरकार विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला. व तहसिल कार्यालयाकडे निवेदन सुपूर्त केले.
सदर आंदोलना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ओबीसी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या संविधानिक न्याय्य मागण्याची निवेदने तहसीलदार मार्फत देण्यात येणार आहेत. या आंदोलनात ओबीसी जनमोर्चा, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी युवा फेडरेशन, ओबीसी फौंडेशन, तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, अखिल भारतीय आगरी समाज परिषद, अखिल भारतीय भंडारी महासंघ, कोळी माछिमार संघटना, माळी समाज संघ, धनगर आंदोलन समिती, गुरव ज्ञाती संघ, तसेच सुतार, नाभिक, शिंपी, कुंभार, लोहार, कोष्टी, धोबी, कासार, तेली अशा विविध जातींच्या संघटना सहभागी झाल्या होत्या.
यासाठी रायगड जिल्ह्यात १५ तालुक्यात ओबीसी जनमोर्चा-महाराष्ट्र (ओबीसी, VJNT, SBC, अलुतेदार, बलुतेदारांचे संघटन) अध्यक्ष, ओबीसी नेते प्रकाश अन्ना शेंडगे कार्याध्यक्ष ओबीसी नेते चंद्रकांत बावकर, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यात ओबीसी संघर्ष समन्वय समिती अध्यक्ष सुरेश मगर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष खटावकर, शिवराम महाबळे, शिवराम शिंदे, अॅड. मनोजकुमार शिंदे, माधव आग्री, डॉ. सागर सानप, डॉ. मंगेश सानप, तालुका सचिव महादेव सरसंबे, उपाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, अनंत थिटे, अमोल पेणकर, उत्तम नाईक, खजिनदार दत्ताराम झोलगे यांसह तालुका कार्यकारिणी, सदस्य, सानेगाव विभाग अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, धाटाव विभाग अध्यक्ष अमित मोहीते, सभापती रोहा रामचंद्र सकपाळ, सतीश भगत, रामचंद्र म्हात्रे, नवनीत डोलकर, उत्तम नाईक, अरविंद मगर, चंद्रकांत भगत, अनिल भगत, दत्ता चव्हाण, केशव भोकटे, खांब विभाग अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, चणेरा विभाग अध्यक्ष संतोष देवळे, दत्ताराम झोलगे, शशिकांत कडू, नामदेव म्हस्कर, संदेश मोरे, गुणाजी पोटफोडे, काशिनाथ बामुगडे, सरपंच मोरेश्वर खरिवले यांसह विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थितीत हे आक्रोश आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले.