मांडवखार-अलिबाग येथील ९५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात
अलिबाग (रत्नाकर पाटील) : अलिबाग तालुक्यातील मांडवखार गावातील नथुराम महादेव मोकल या ९५ वर्षीय आजोबांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
खारेपाट विभागातील मांडवखार येथील प्रसिद्ध बागायतदार व कुशल शेतकरी नथुराम महादेव मोकल (वय९५) यांना ताप खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना २३ मे २०२१ रोजी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना खूप त्रासही होऊ लागला होता. परंतु प्रबळ इच्छाशक्ती व अलिबाग सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांनी नथुराम मोकल या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
बरे झाल्यावर त्यांनी कोरोनाला न घाबरता वेळेवर उपचार घेतल्यावर व डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यावर कोरोनाला हारवू शकतो तसेच सर्व कर्मचारी व मुलगा आनंद मोकल, धनंजय मोकल यांच्या प्रयत्नांमुळेच मी कोरोनावर मात केली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयातील नर्स व कर्मचारी यांनी त्यांना आनंदाने निरोप दिला.