सुदर्शन केमिकल्सचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात कौतुकास्पद पाऊल! 

पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन

रोहा (रविना मालुसरे) : मागील एक-दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे सर्वच नागरिक भयभीत झालेले आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे. सामाजिक उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या सुदर्शन केमिकल्स लिमिटेड धाटाव या आघाडीच्या उद्योगसमूहाने आजवर कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनास उत्तम सहकार्य केले आहे. आपल्या कारखान्यांतील कार्यरत कामगार, अधिकारी वर्ग, कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी, लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाने घेतला. या अनुषंगाने आज दिनांक २१ जून रोजी रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री महाराष्ट्र शासन  आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन सुदर्शन केमिकल्स धाटाव येथे करण्यात आले. 

याप्रसंगी मधुकरराव पाटील, विजयराव मोरे, प्रांताधिकारी यशवंतराव माने, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, जयवंतदादा मुंडे व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी,मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष विज,प्रमुख मनुष्यबळ व्यवस्थापक शिवलीला पाटील,कंपनी प्रमुख विवेक गर्ग, व्यवस्थापक व सामाजिक बांधिलकी विभाग प्रमुख माधवी सणस, रविकांत दिघे यांसह अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना पालकमंत्र्यांनी सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. 

आपल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणारी सुदर्शन केमिकल्स ही सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढे असते याबद्दल त्यांनी कंपनीचे अभिनंदन केले.कंपनीने सदोदित असेच योगदान द्यावे,त्यासाठी कंपनीला योग्य ते सहकार्य सदोदित देण्यात येईल असे आश्वासित केले.

सुदर्शन केमिकल्सने आपल्या कामगार व कुटुंबियांसाठी सुरू केलेल्या लसिकरण केंद्रामुळे कामगार व अधिकारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog