वरसे येथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरणार?
नैसर्गिक नाल्यावर अनधिकृत बांधकामे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग झाले बंद!
पत्रकार समीर बामुगडे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरिय कारवाई होण्याच्या मार्गावर!
रोहा (प्रतिनिधी) : वरसे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सातमुशी नाल्यावर व अन्य ठिकाणी अनधिकृत बांधकामे केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी रोहा तालुक्यातील पत्रकार समीर बामुगडे यांनी रोहा तहसिलदार आणि रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. सदरची तक्रार ही योग्य असल्यामुळे चौकशीअंती या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरण्याची शक्यता आहे.
बेजबाबदार लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांची संख्या वाढलेली असून राजकीय वरदहस्तामुळे ही अनधिकृत बांधकामे आजपर्यंत सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.
पत्रकार समीर बामुगडे यांच्या तक्रारीनंतर या अनधिकृत बांधकामांविरोधात लवकरच कारवाई अपेक्षित आहे!