परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्तीकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे
अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून शासन निर्णय क्र. आदिशी-1203 / प्र.क्र.76/ का.12 दि. 31 मार्च 2005, दि.11 एप्रिल 2012 व दि.16 मार्च 2016 अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी दि.25 जून 2021 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्जाचा नमुना, योजनेच्या अटी व शर्ती या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण येथे संपर्क साधावा आणि अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड, कृषी उत्पन्न बाजार समिती, पहिला मजला, धरमतर रोड, रायगड बाजार जवळ, पेण, जि. रायगड, तसेच ई-मेल poitdp.pen-mh@gov.in व दूरध्वनी क्रमांक 02143-252519 येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे.