राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन यशवंतखार येथे वृक्षारोपण कार्यक्रमाने संपन्न
रोहा (रविना मालुसरे) : रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे व आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाविसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण कोकण तसेच रायगड जिल्ह्याची चक्रीवादळामुळे प्रचं पर्यावरणीय हानी झाली. तसेच कोरोना विषाणू सोबत सामना करत असताना ऑक्सिजनचे आपल्या जीवनातील स्थान अधोरेखित झाले. ह्या सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन अनिकेतभाई तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वृक्षारोपण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
आमदार अनिकेत भाईंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दिनांक १० जून २०२१ रोजी ग्रामपंचायत यशवंतखार च्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतखारच्या परिसरात वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाविसावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व संतोष नथुराम भोईर, यशवंतखार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वप्नाली भोईर, ग्रामपंचायत सदस्य श्री. तुषार ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. हरिभाऊ दिवकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश सुरणकर, गणेश मोरे, दीपक दिवकर, यमुना जांभळे, भारती दिवकर, पदीबाई दिवकर, प्रविण ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.