माणगांव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक आदिवासीवाडी येथे वृक्षारोपण व आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप
माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ आणि अंकुर फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम!
माणगांव (प्रमोद जाधव) : माणगांव तालुक्यात १९ जून रोजी ज्येष्ठ पत्रकार अरुणदादा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ व गेले १३ वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अंकुर फाऊंडेशन व वन परिक्षेत्र विभाग माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगांव-लोणेरे विभागातील पन्हळघर ग्रामपंचायत हद्दीतील पन्हळघर बुद्रुक अदिवासी वाडीत वृक्षारोपण करण्यात आले व वाडीतील एकूण ३९ कुटुंबांना एक आठवडा पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, स्वदेश फाऊंडेशनचे तुषार इनामदार, माणगांव तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अरुण पवार, मा. सभापती महेंद्र तेटगुरे, अंकुर फाऊंडेशनचे सल्लागार मंगेश पेठे, माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र कुवेसकर, उपाध्यक्ष प्रमोद जाधव, कार्याध्यक्ष उदय चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार अनिल मोकाशी, सचिव सुनील राजबर, खजिनदार परेश शिंदे, सहखजिनदार वैभव सत्वे, प्रसिध्दी प्रमुख राम भोस्तेकर, पत्रकार मुकेश कडू, पत्रकार पांडुरंग माने, पत्रकार किरण शिंदे, पत्रकार निरंजन कळस, चिंतामणी बटवले, मारूती, ग्रामपंचायत सदस्य अंजली घोगरेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घोगरेकर, न्हावे मा. सरपंच शशिकांत अंधेरे, पन्हळघर बुद्रुक आदिवासी वाडीतील ग्रामस्थ हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पन्हळघर बुद्रुक अदिवासीवाडी राजिप शाळेचे मुख्याध्यापक सुजित भोजने यांनी केले.
या कार्यक्रमात पन्हळघर बुद्रुक आदिवासी वाडीत वड, पिंपळ, जांभूळ व जंगली झाडे व व फळ झाडे यांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात आपल्या मनोगतात विचार मांडताना स्वदेस फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार म्हणाले की? माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाने माणगांव ते लाखपाले हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण खूप याकरिता नागरिकांकरिता रुग्णवाहिकेची मागणी केली आहे व ती मागणी स्वदेसचे संचालक व व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून लवकर मार्गी असे मत इनामदार यांनी व्यक्त केले व लोकशाहीचा चौथा स्तंभ देखील जनसेवेच्या मागण्यांकरिता पुढे सरसावला आहे व अग्रक्रम देखील प्राप्त केला आहे.
त्यामुळे पत्रकारांची मागणी आम्हाला मान्य करावीच लागेल असे देखील तुषार इनामदार यांनी स्पष्ट केले. माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ व अंकुर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात घेतलेल्या या उपक्रमाचे माणगांव तालुक्यातून कौतुक होत आहे.