माणगांव उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समिती सभेचे आयोजन 

बहुजन युथ पॅन्थर अध्यक्ष भाई जाधव यांच्या प्रयत्नांना यश

साई/माणगांव (हरेश मोरे) : माणगांव उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी रुग्णांना वैद्यकीय सुविधा अपुऱ्या मिळत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असते. त्यामुळे बहुजन युथ पॅन्थरचे संस्थापक भाईसाहेब जाधव यांनी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंगोले यांची सोबत भेट घेतली. त्यावेळी भाईसाहेब जाधव यांनी रुग्ण कल्याण समितीची सोमवार 22 जून रोजी तातडीची मिटिंग आयोजित करण्याची विनंती केली जेणेकरून येथील रुग्णांना योग्य सुविधा मिळतील व मृत्यूच्या प्रमाणात घट होईल.

माणगांव मध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूदरामध्ये वाढ होण्याची शक्यता वाटत आहे. या रुग्णालयामध्ये गरीब सर्वसामान्य रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट असते. याकरिता या रुग्णालयात रुग्णांना योग्य सुविधा मिळाली पाहिजे. ज्या सुविधा अपूर्ण आहेत त्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री यांची लवकरच भेट घेऊन या रुग्णालयात असणाऱ्या समस्या तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शिपाई, परिचारिका यांची रिक्त पदे भरण्यात यावे यांची मागणी करणार असून जनतेला चांगल्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

याकरिता डॉ. इंगोले यांनी सुद्धा सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली असून गरीब रुग्णांना याच ठिकाणी योग्य उपचार दिले जातीलअसे सांगितलं. त्यावेळी डॉक्टरांना असणाऱ्या अडचणींची माहिती भाईसाहेब जाधव व कार्यकर्त्यांना दिली. यावेळी बहुजन युथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव, कोकण प्रदेश अध्यक्ष विजय जाधव, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंदेश मोरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रफिक कुरुकर, माणगांव तालुका अध्यक्ष रोहन शिर्के, उपाध्यक्ष सिजू जोगीळकर, माणगांव तालुका महासचिव सुशील कासारे, मयूर मोरे, अजय कासारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Popular posts from this blog