कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना यश

तळा (संजय रिकामे) : राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी तळा तालुक्यातील कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून मान्यता मिळाली आहे. 

कुडा, ता. तळा येथे 26 कोरीव लेण्यांचा समूह कोरलेला आहे. या लेण्यांची नोंद इ.स.1848 मध्ये सापडली असून सहाव्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लेणीतील 26 गुहांपैकी 4 चैत्यगृहे याठिकाणी आढळतात. भिक्षूंना राहण्यासाठी त्याकाळात व्यवस्था केली जात असल्याचे दिसून येते. भगवान गौतम बुध्दांच्या कोरीव प्रतिमादेखील यामध्ये आहेत. येथील लेण्यांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्राचीन बौध्द लेणींचा पर्यटनांत समावेश करून येथील विकास करण्यात येणार आहे. तळा तालुक्यातील कुडा लेणी या पर्यटनस्थळाचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिश: लक्ष घालून प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.

Popular posts from this blog