महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य च्या कोकण विभागीय अध्यक्षा पदावर दिपीका चिपळूणकर
रोहा (समीर बामुगडे) : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ. दिपीका दिपक चिपळूणकर यांची महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य च्या कोकण विभागीय अध्यक्षा पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरची नियुक्ती ही संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यांनी आपल्या कार्यकुशलतेने सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांत पुरस्कार मिळविलेले आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे महिलांच्या सुरक्षेला आणखीनच मजबूती मिळणार हे निश्चितच!