पाटणूस परिसरातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात 

शक्ती पीठे सह्याद्री ट्रेकर्स संस्था वडगाव शेरी पुणे यांचा स्त्युत्य उपक्रम

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस येथील फणशी दांड आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना गामपंचायत पाटणूसचे माजी उपसरपंच आदेश दळवी यांच्या प्रयत्नाने "शक्ती पीठे सह्याद्री ट्रेकर्स संस्था वडगाव शेरी पुणे" यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

या टीमच्या वतीने शर्मिली प्रभुदेसाई, प्राची जगताप, रविना कुदळे, किरण गायकवाड, सचिन कांबळे, सौरभ हुलजुते, आशिष पाल, सतीश देशमुख, आकाश स्वामी, हनुमंत नूनसावंत, मंगेश गवांदे, सुदर्शन बैरागी, प्रसाद बाचे, कृष्णा बेगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर ग्राम पंचायत पाटणूस चे माजी उपसरपंच, आंदेश दळवी, माजी सदस्या लक्ष्मी जाधव, सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हामुणकर, विष्णू जाधव व फणशी दांड आदिवासी वाडीतील आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावरून शक्ती पीठे सह्याद्री ट्रेकर्स संस्थेच्या टीमचे स्वागत करताना पाटणूस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आंदेश दळवी म्हणाले की, सामाजिक बांधिलकीतून ही संस्था नेहमीच गोरगरिबांना मदत करीत असते त्याचाच एक भाग म्हणून या लॉकडाऊनच्या काळात रोजगार बुडालेल्या आदिवासी बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेज देण्यासाठी ते फणशी दांड आदिवासी वाडीत आले आहेत. त्यांचे मी शब्द सुमानाने स्वागत करतो. पुणे शहरात व अन्य शहरामध्ये लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या अनेक कामगारांना या संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. परंतु शहरामध्ये दिलेल्या पॅकेज मधिल निवडक वस्तू घेऊन बाकी वस्तू नागरिक फेकून देत आल्याचे या संस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन आदिवासी बांधवांसारख्या गरजू लोकांनाच मदत करायची या उदात्त हेतूनेच ही संस्था येथे आल्याचे आंदेश दळवी यांनी सांगितले. 

उपसरपंच असताना आंदेश दळवी यांनी आदिवासी बांधवांना दिवाळीची मिठाई वाटप, अन्नधान्य वाटप, बेंजो साहित्य वाटप यांसारखे अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे सुदर्शन बैरागी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची संकल्पना सांगताच आंदेश दळवी यांनी या संस्थेंला येण्याचे आमंत्रण दिले व फणशीदांड आदिवासी वाडीत सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. फणशी दांड आदिवासी वाडीच्या वतीने माजी सदस्या लक्ष्मी जाधव यांनी संस्थेंचे आभार मानले.

Popular posts from this blog