माणगांव सत्र न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल आदिवासी महिलेला मिळाला न्याय!
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांचा सत्कार
माणगांव (प्रतिनिधी) : म्हसळा तालुक्यातील एका आदिवासी महिलेवर अत्याचार झाला होता. या पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी माणगांव सत्र न्यायालयातील अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. योगेश तेंडुलकर यांनी चांगल्या प्रकारे युक्तिवाद घडून आणला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण युक्तीवादामुळे सदर आदिवासी महिलेला न्याय मिळवून देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा मिळाली. त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल आदिवासी समाजाच्या माणगाव रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला, त्यामध्ये पत्रकार भिवा पवार तळा तालुका आदिवासी संघटना संघटक, परशुराम पवार दक्षिण रायगड कातकरी युवक अध्यक्ष उमेश जाधव, सचिव संतोष वाघमारे भिरा, संजय कोळी निजामपूर, धर्मराज कोळी सर, गोविंद पवार सर, तळा तालुक्यातील बाळाराम पवार, यशवंत धोंडू जाधव, नथुराम मुकण, चंदर पवार, बंडू कोळी, माणगाव नाईटणे गावचे अध्यक्ष नामदेव जाधव कृष्णा वाघमारे राजा पवार चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
या पीडित महिलेला मिळालेल्या न्यायामुळे आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळावला आहे असे मत तळा तालुका आदिवासी संघटनेचे संघटक परशुराम पवार यांनी व्यक्त केले.