गावठण येथे शैलेश कदम यांच्या वाढदिवसानिमीत्त विद्यार्थ्यांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रम संपन्न
रोहा (रविना मालुसरे) : गावठण, ता. रोहा येथील होतकरू विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. शैलेश नारायण कदम यांचा वाढदिवस प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊ व मोफत छत्री वाटप कार्यक्रमाने संपन्न झाला. शैलेश कदम यांना समाजसेवेची आवड आहे. त्याचप्रमाणे ते अनेक सामाजिक कार्यांत पुढाकार घेत असतात.
आपल्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते दरवर्षी मदत करीत असतात. शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप कार्यक्रमासाठी शरद कदम, तुषार मालुसरे, रवींद्र तेलंगे, परेश भोकटे, समीर कांदळेकर, प्रकाश बामुगडे ,श्री. चव्हाण सर व विद्यार्थी उपस्थित होते.