चणेरे विभाग राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसच्या आढावा बैठकीला उत्तम प्रतिसाद 

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

रोहा (रविना मालुसरे) : खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चणेरे तालुका रोहा येथे राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसच्या वतीने कुणबी भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

खासदार सुनिलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार अनिकेत तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात महिला व युवती काँग्रेसच्या आढावा बैठकांचे सत्र सुरू आहे.

दिनांक ३० जुन २०२१ रोजी चणेरे येथील कुणबी भवनात चणेरे विभागीय राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसची आढावा सभा महिला तालुका अध्यक्षा प्रितमताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महिला व युवतींनी संघटित होऊ आपल्या विभागात विविध उपक्रम राबवावेत.आगामी काळात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे अवाहन करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी रोहा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ. प्रितम पाटील, रोहा तालुका पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ, माजी उपसभापती दर्शना कांडणेकर, विभागिय नेते हरिश्चंद्र वाजंत्री, युवक संघटक मयुर विचारे, अतिश मोरे, चंद्रशेखर विचारे, विनोद साळवी, किशोर मोरे, संतोष पार्टे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रविना मालुसरे व सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog