पोलीस अधिकाऱ्याच्या रूपाने देव प्रकट झाला!
बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : कोरोना संक्रमण सुरु झालं व शासनाने लॉकडाऊन जाहिर झाला. या कालावधी पासून खाकी वर्दीचा सर्व नागरीकांनी धसका घेतला व लॉकडाऊन मुळे पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आणि नागरिकांचे जगणे कठीण झाले.
२०२१ मध्ये संदिप पोमण यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यामधे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदभार स्विकारल्यानंतर वाढता कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सर्व शासकीय स्थरांतून अर्थव्यवस्थेला बाधा न आणता लॉकडाऊनची, बंद व चालु स्थिती अत्यंत कौशल्याने सांभाळून नागरीकांच्या मनात प्रेम युक्त आदराचे स्थान निर्माण केले. या दिघी सागरीमध्ये पोलीसांना नेहमीच पत्रकारांनी सहकार्य व चांगल्या बातम्या ही लिहील्या. पण पत्रकार हे कोरोना योद्ध्याचा भाग असून त्यांच्या ही जीवीताला धोका आहे याचा विचार फक्त दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप पोमण यांनी केला असल्यामुळे पत्रकांरानी पोमण यांना धन्यवाद दिले.
प्रसारमाध्यमांना प्रासिद्धीसाठी आवर्जुन बोलावले जाते. इतरांप्रमाणे पत्रकार दुखू नये यासाठी त्यांनाही एखादं फुलं देऊन सन्मान केला जातो. पण कोरोना काळात इतरांप्रमाणे पत्रकारही कोविड योद्धा सारखेच काम करत आहेत. पण याची आजपर्यंत कोणीच दखल घेतली घेतली नाही याची खंत वाटते, परंतु ती पत्रकारांची दखल मात्र पोलीस निरिक्षक संदिप पोमण यांनी घेतल्यांनी पत्रकारांनी पोमण यांना धन्यवाद दिले आहेत.
दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप पोमण यांनी पद भार स्विकारल्यापासून सामाजिक सेवेचा धडाका लावला असुन लॉकडाऊन काळात ४०० हून अधिक गोरगरीब व गरजु कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप तर काहींना सेनीटायझर व माक्सचे वाटप करुन खाकी वर्दीची प्रतिमा उंचावली असून हा पोलीस अधिकारी नसून एक खाकी वर्दीतल्या देव माणूस आहे अशी संदीप पोमण यांच्या बद्दल जन सामान्य माणसांत प्रतिमा निर्माण झाली आहे.
सदर कार्यक्रम हा दिघी सागरी पोलीस ठाणे बोर्ली पंचतनमध्ये आयोजित करण्यात आला होता.