स्थानिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या क्लॅरियंट कंपनी विरूद्ध कारवाई कधी होणार?

कितीही सामाजिक कार्ये केली तरी प्रदूषणामुळे होणारे नुकसान थांबेल का?

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरणार! 

रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील क्लॅरियंट कंपनीचे प्रदूषण हे स्थानिकांसाठी जीवघेणे ठरू लागले असून या कंपनीने कितीही सामाजिक कार्य केली तरी येथील प्रदूषणामुळे या परिसरात प्रदूषणामुळे होणारे नुकसान थांबेल का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे!

या परिसरात रोठ खूर्द गावाची शेती व लोकवस्ती असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये क्लॅरियंट कंपनीने दुषित सांडपाणी सेडल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे. प्रशासनाने पण या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप असून कंपनीची "दुषित कार्यपद्धत" संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली?

या कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवर प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली. परंतु अद्यापही या कंपनीविरूद्ध कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने येथे अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट दिली की कंपनीकडून भेट घेतली? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे! कारण यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्वाची असून कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात कोणतीही कारवाई झाल्याची चिन्हे येथे दिसून आलेली नाहीत. परिणामी या कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात उच्चस्तरिय चौकशी होणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog