राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसची नागोठणे येथे आढावा बैठक संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्याचा नारीशक्तीचा निर्धार
रोहा (रविना मालुसरे) : खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनिकेत तटकरे व रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक २९ जुन २०२१ रोजी नागोठणे येथे ज्येष्ठ नेते दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी नागोठणे विभागातील राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस रोहा तालुका अध्यक्षा प्रितमताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा सभेत महिलांनी सक्रियरित्या पक्षाचे काम करण्याचा निर्धार केला.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यासुद्धा महिला असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाडली आहे. त्या आपला आदर्श आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही पक्षकार्यात झोकून देऊन काम करूया, असे आवाहन यावेळी प्रितमताई पाटील यांनी केले.
महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी पेण- सुधागड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष श्री. शिवरामभाऊ शिंदे व विक्रांत घारे उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये विविध उपक्रम राबविणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसचे विकेंद्रीकरण केले जाणार असून कर्तृत्ववान महिला व युवतींना पक्षकार्याची संधी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्षा अमिता शिंदे, नागोठणे शहराध्यक्षा सुजाता जवके, उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे, महिला सरचिटणीस अक्षताताई शिर्के, सुप्रिया जाधव, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रविना मालुसरे व नागोठणे विभागातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.