खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते चिंचबादेवी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भुमिपूजन
बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : बोर्ली पंचतन येथे गावचे जाग्रुत देवस्थान आई चिंचबादेवीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली असून बोर्लीपंचतन पंचकमिटी बोर्ली पंचतन ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या विनंती नुसार खासदार सुनिल तटकरे यांनी सदर रस्त्याला वीस लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. त्या कामाचे भुमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंचबादेवी कमिटीचे अध्यक्ष सुजित पाटील यांनी केले.
खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी श्रीवर्धन परिसरातील परिस्थितीचा व विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी सांगितले या भागातील अंतर्गत रस्ते टप्या टप्पयाने करण्यात येतील. तर तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानग्रस्तांना लवकरच अनुदान मिळेल. त्याचे काम अधिकारी वर्ग करीत आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष महंमदभाई मेमन, सरपंच नम्रता गाणेकर, मुस्लिम समाज अध्यक्ष मनसुर गिरे, सदस्य सचिन कीर, मिना कुमार गणेकर यांच्यासह कमिटीचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते