क्लेरियंट कंपनीच्या भयानक प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका!
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष?
रोहा (समीर बामुगडे) : धाटाव औद्येगिक वसाहतीत क्लेरियंट कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या दुषित सांडपाण्यामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. परिणामी या जीवघेण्या कंपनीच्या जलप्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.
या कंपनीच्या परिसरात रोठ खूर्द गावाची शेती व लोकवस्ती असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये क्लेरियंट कंपनीने दुषित सांडपाणी सेडल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे. प्रशासनाने पण या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
यासंदर्भात कंपनी व्यनस्थापनाशी संपर्क साधून ही समस्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला व्यवस्थापनातील अधिकारी श्री. बडकस यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला. तसेच, येथील इटीपी इनचार्ज श्री. शैलेश नकाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तर मोबाईलच स्विच ऑफ करून संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही कंपनीची "दुषित कार्यपद्धत" संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रदूषण लपविण्यासाठी सामाजिक कार्यांचे नाटक?
या कंपनीच्या भयानक प्रदूषणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून येथील शेती दुषित सांडपाण्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, हे "दुषित कार्य" लपविण्यासाठी या कंपनीने एक अनोखी शक्कल लढविली असून या परिसरात सामाजिक कार्यांचा दिखावा सुरू केला आहे. परंतु प्रत्यक्षात पाहता स्थानिकांना त्रास देणारी ही कंपनी इथे असून उपयोग काय? असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
या गंभीर समस्येबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीविरूद्ध तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.