सावधान...! ग्रुपग्रामपंचायत वरसे रोहा मध्ये ही बांधकामे बेकायदेशीर
मालमत्ता खरेदी करण्यापुर्वी खात्री करून घेण्याचे आवाहन
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील ग्रुप-ग्रामपंचायत वरसे येथील सर्व्हे नंबर 4/3, 4/4, 4/5, 16/0, 15/0, 38/3, 42/3, 43/2ब 44/5, 51/2अ, 53/3ब, 57/1,57/2, 67/2, 17/1, 14/0, 17/5, 38/6, 17/2 या सर्व्हे नंबर वर दि. 26/02/2002 रोजी उपविभागीय अधिकारी माणगाव यांनी दि. 26/12/2001 रोजी तहसिलदार रोहा यांच्या आदेशास अंतिम निकाल होईपर्यंत स्थगिती आदेश दिले आहे.
उपविभागीय अधिकारी माणगाव यांचा अंतिम स्थगिती आदेश असताना दावा उपविभागीय अधिकारी रोहा यांच्या कोर्टात न्यायप्रविष्ट असताना दाव्याचा निकाल लागला नसताना बेकायदेशीर जमीन विक्री करण्यात आली आहे. सर्व्हे नंबर 38/3, 38/6 मध्ये अनधिकृत बेकायदेशीर इमारती बांधकाम झाले आहे व बांधकाम चालू आहे. भ्रष्ट शासकीय अधिकारी आणि त्यांच्या मागे असलेली राजकिय पॉवर यामुळेच सर्व्हे नंबर 38/3, 38/6 अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम चालू आहेत तरी सर्व नागरिकांना या द्वारे सावधानतेची सुचना देण्यात येत आहे की त्यांनी उपविभागीय अधिकारी माणगांव यांच्या अंतिम स्थगिती असलेल्या वरील सर्व्हे नंबर कोणताही व्यवहार करू नये. अन्यथा आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. या बाबत अधिक माहितीसाठी रविंद्र चंद्रकांत चव्हाण यांच्याशी 8793468658 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
आपण ही पोस्ट सर्व रोहा नागरिकांना पाठवून त्यांना आर्थिक नुकसानीपासून वाचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.