मी मराठी प्रतिष्ठान रायगड विद्यमाने वृक्षारोपण व वृक्षसंगोपन स्पर्धा संपन्न

रायगड (प्रतिनिधी) : मी मराठी प्रतिष्ठान रायगड यांच्यावतीने दिनांक ०६ जून २०२१ रोजी जागतीक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त "वृक्षारोपण व संगोपन स्पर्धा" रायगड  जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गुळधे ग्रामपंचायत व  मेघरे ग्रामपंचायत तसेच म्हसळा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत मांदाटने येथे १२०० वृक्षरोपण करण्यात आले. फक्त वृक्ष लावून चालणार नाही तर त्यांचे संगोपन देखील व्हावे यासाठी ०५ वर्षाच्या निरीक्षणानंतर या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकाने वाटप करण्यात आलेले वृक्षांचे योग्यरीत्या संगोपन केले तर प्रतिष्ठाणकडून विशेष असे पारितोषिक देण्यात येणार आहे.  

या कार्यक्रमाला श्रीवर्धन मधील जसवली येथील कृषीतज्ञ आणि लोकनेते ग. स. कातकर साहेब यांना पुष्पहार घालून एकादशीनिमित्त मंदिरातील विठ्ठल-रखुमाईची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बापवली व म्हसळा तालुक्यातील पाष्टी या ठिकाणी कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाला मी मराठी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, सभापती, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व प्रमुख मान्यवर उपस्थित होते  सभापती सौ. छायाताई म्हात्रे, विस्तार अधिकारी गायकवाड साहेब, कृषी अधिकारी बाकर साहेब , गुप ग्रामपंचायत मांदाटणे, सरपंच चंद्रकांत पवार, माजी सरपंच मनवे साहेब, माजी सरपंच राजाराम धुमाळ साहेब , पाष्टी शाळेचे चेअरमन शांताराम कांबळे साहेब, ग्रामसेवक ठाकरे साहेब,  मी मराठी प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी, मावळे, शिक्षक सहकारी श्रीवर्धन प्रमुख पाहुणे युवानेते दर्शनभाई विचारे, समाजसेवक श्री महेश पवार, श्री दशरथ कातकर सर, सरपंच श्री किसन शिगवण, सरपंच सौ स्नेहल पवार, श्री शब्बीर भाई फिरफिरे, परशुराम अडगावले उपस्थित होते.

Popular posts from this blog