आदिवासी समाजात परिवर्तन शिक्षणाने होईल, शिक्षणासाठी प्रयत्न करणार! 

- सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले 

रायगड (प्रतिनिधी) : आदिवासी समाजात प्रगती व्हायची असेल तर त्यांच्यात परिवर्तन व्हायचे असेल त्यासाठी शिक्षणाची गरज असून आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन गोरेगाव पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी केले.  गोरेगाव पोलीस ठाण्यात नवीन कार्यभार स्वीकारल्यानंतर तळा, माणगाव, गोरेगाव, परिसरातील आदिवासी समाज बांधवांनी तसेच तालुक्यातील तसेच गोरेगाव परिसरातील शिरवली, नाईटणे, महादपोली, देगाव, आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले म्हणाले की, आदिवासी समाजात  शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्याचे परिवर्तन विकास साधायचा असेल तर त्यांना शिक्षण देणे गरजेचे असून गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. ही मोठी समस्या असून त्यांनी शिक्षण घेऊन प्रगती साधावी. म्हणून आदिवासी मुले दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च मी स्वतः करीन. हा समाज आपला समाज असून आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेने आपण या समाजासाठी सहकार्य केले पाहिजे या भावनेने आपण आदिवासी मुले दत्तक घेऊन त्यांच्या शिकणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी मत मांडले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय गावडे, हवालदार  यशवंत चव्हाण, पोलीस नाईक गणेश समेळ, राहुल कडू इत्यादी गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी यावेळी तळा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष गोविंद पवार, दक्षिण रायगड कातकरी संघटनेचे सचिव उमेश जाधव, संघटक परशुराम पवार, पत्रकार भिवा पवार, दिनेश कातकरी, राजन पाटील, धर्मराज कोळी, तसेच नाईटणे गावचे अध्यक्ष नामदेव जाधव, कृष्णा वाघमारे, राजा पवार, बेंडू  हिलम, लक्ष्मण कोळी, हरीश कोळी, प्रकाश जाधव, चंद्रकांत वाघमारे, बाळाराम वाघमारे, विठ्ठल कोळी, गणपत कोळी, रामा कोळी, समीर कोळी, चंद्रकांत जाधव, दिपक जाधव, भागूराम  वाघमारे, सुरेश जाधव, नवनाथ वाघमारे, मंगेश वाघमारे तसेच रामदास पवार, नथुराम पवार अनंत पवार, रवींद्र पवार व दशरथ हिलम इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते. 

Popular posts from this blog