चक्रीवादळादरम्यान व वादळानंतर दूरसंचार व दळणवळण सेवा अखंडित सुरु ठेवण्याकरिता बीएसएनएल सदैव कटिबद्ध

कोणतेही नेटवर्क खंडित झाल्यास बीएसएनएलच्या विशेष सेवेचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासन व बीएसएनएल चे आवाहन

तळा (संजय रिकामे) : "ताउक्ते" चक्रीवादळाच्या अनुषंगाने बीएसएनएल ने "DOT" भारत सरकारच्या ICR (इंट्रा सर्कल रोमिंग ड्युरिंग डिजास्टर) आपत्ती व्यवस्थापन सूचनेनुसार, आपले मोबाईल नेटवर्क "ताउक्ते" (Tauktae) चक्रीवादळाच्या दरम्यान व वादळानंतर सर्व इतर कंपन्यांच्या मोबाईलधारकांकरिता खुले करणे अपेक्षित आहे. चक्रीवादळादरम्यान व वादळानंतर दूरसंचार व दळणवळण सेवा अखंडित सुरु ठेवण्याकरिता बीएसएनएल सदैव कटिबद्ध आहे. 

प्राप्त सूचनेनंतर कोणत्याही मोबाईल ग्राहकाला बीएसएनएल चे नेटवर्क आपल्या मोबाईल मधून मॅन्यूअली (Manually) सिलेक्ट करावे लागेल व त्याकरिता कोणतेही वेगळे शुल्क नाही लागणार नाही.

तरी नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेषतः पुढील दोन दिवसात होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या परिस्थितीत आपल्या मोबाईलची सेवा खंडित झाल्यास बीएसएनएलच्या या नि:शुल्क सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि बीएसएनएल ने केले आहे.

Popular posts from this blog