दिघी सागरी पोलीस ठाणे आणि शिवशंभू प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : दिघी सागरी पोलीस ठाणे बोर्ली पंचतन येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पोमण यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून सामाजिक कार्याचा धडाका लावला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील डोंगराळ भागातील ३५० गरीब व गरजू कुटुंबांना धान्य कडधान्याचे वाटप व आजचे आयोजीत केलेले रक्तदान शिबीराचे आयोजन या मुळे खाकी वर्दीतील माणसाने मनात आणलं तर सामाजीक सेवेचे प्रत्येक पैलु समाज सेवेस तत्पर ठेवु शकतो त्याच्या या कार्याचे व शिवशंभु प्रतिष्ठानचे या परिसरात कौतुक होत आहे. 

या शिबिरात जवळ जवळ ८० ते ८५ रक्त दात्यानी उत्सस्फुर्थ पणे रक्त दात्यानी रक्तदान केले. त्यांना प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले तर उपस्थित पत्रकारांना, रायगड जिल्हा रक्त संक्रमण आधीकारी दिपक गोसावी व उपस्थितीतांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व महाराष्ट्राला पडत असलेला रक्ताचा तुटवडा त्या मध्ये अल्पशी रक्ताची मदत शासनाला करण्या साठी दिघी सागरी पोलीस ठाणे आणि शिव शंभू प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिघी सागरी पोलीस ठाणे बोर्ली पंचतन येथे करण्यात आले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, पत्रकार वैभव तोडणकर व पोलिस कर्माच्यारी व इतर शिवशंभू चे पदाधिकारी सदस्य व नागरीक आशा ८१ जणानी रक्तदान केले आहे. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चाळके यांनी केले.

शिवशंभू प्रतिष्ठान चे सर्व सहकारी, अध्यक्ष श्री महेश चौलकर, रुपेश नाकती, निलेश नाक्ती, शंकर गाणेकर, दिलीप नाक्ती, सुभाष चौलकर, संदीप पोमण पोलीस उप निरीक्षक, कर्मराज गावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, निलेश सोनावणे पोलीस कर्मचारी वृंद यांनी हे शिबिर आयोजित करण्यास खूप मेहनत घेतली होती. 

रक्त दात्यांकदून रक्त घेण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेउन आगदी हाळूवारपणे रक्तदात्यांना सुई टोचून रक्त घेण्यासाठी रक्त पेढीचे रायगड जिल्हा रक्त संक्रमण आधीकारी शासकीय रुग्णालय आलिबाग श्री. दिपक गोसावी व टीम यांनी त्यांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली.

या कार्यक्रमाच्या वेळी दिघी सागरीचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांनी रक्तदान ही आजची किती गरज आहे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

Popular posts from this blog