बोर्लीपंचतन येथे कोव्हीड योद्ध्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
बोर्लीपंचतन (मुजफ्फर अलवारे) : बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोव्हीड योद्धा डॉक्टर, आरोग्य सेविका व पोलीस कर्मचारी वर्गाला शिवम मेडीकल आणि गोखले एज्युकेशन सोसायटी तर्फे माक्स व सानिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर, आरोग्य सेविका यांचा कृतज्ञता मानून सत्कार करण्यात आला
शासकीय नियमांचे पालन करुन करण्यात आलेल्या या कार्यक्रमास दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, डॉ. तडवी, डॉ. सुजाता बापट, डॉ. स्मृती तांबे, खोपकर सर, बापट सर, सरपंच नम्रता गाणेकर, उपसरपंच प्रकाश तोंडलेकर, प्राध्यापक एस. वि.जोशी, नितीन सुर्वे आदी उपस्थित होते.