रोहा तालुक्यातील शेणवईमध्ये कोयत्याने हल्ला करुन एकाचा खून, तिघांना अटक
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील शेणवई गावांतील आदिवासीवाडी मध्ये एका व्यक्तीचा खून करून मृतदेह झाडाझुडपात फेकून आरोपी फरार झाले होते. सदर घटना दिनांक १३ मे रोजी सायं. साडेआठ वाजता घडली. मयत रामभाऊ पिंट्या जाधव राहणार शेणवई आदिवासीवाडी यांना पप्पू जाधव यांनी शिवीगाळ करत भांडण केले. तर मोहन जाधव याने घराचा दरवाजा पहारीने फोडून घरात शिरून नुकसान करत मयत रामभाऊ यांना पहारीने मारहाण करून घराच्या बाहेर ओढत आणले तर पप्पू जाधव व राम जाधव या दोन्ही आरोपींनी मयत व्यक्तीला काठीने मारहाण केली तर आरोपी मोहन जाधव यांनी आपल्या हातातील कोयत्याने रामभाऊच्या खांद्यावर आणि पाठीवर कोयत्याने हल्ला केला त्यात रामभाऊ जबर जखमी होऊन जागीच ठार झाले, मयत रामभाऊ याला या तिन्ही आरोपीने ओढत नेऊन शेणवई आदिवासी वाडी वरील भेंड्याचा माळ येथे झाडी-झुडप्यात नेऊन टाकले.
सदर या घटनेचा रोहा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी सुरेखा रामभाऊ जाधव मयत पत्नी वय वर्ष ६० यांनी पोलिसांना संपूर्ण माहिती दिली असता या पिता-पुत्रासह तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीमती सोनाली कदम अलिबाग यांच्यासह रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. किरण कुमार सूर्यवंशी, व रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नामदेव बंडगर करीत आहे.