माणगांव येथे बुद्धपौर्णिमा दिनी बुध्द जयंती उत्साहात साजरी
माणगांव (उत्तम तांबे) : बौद्धजन पंचायत समिती ता. माणगांव, प्रज्ञा विकास बौद्धजन मंडळ व बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक 06 (माणगांव शहर) यांचे संयुक्त विद्यमाने बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे धम्मवंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाला माणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सागर कावळे, श्री. कदम, श्री. ढाकणे, श्री. पाटील, बौ. पं .स. मा .ता. अध्यक्ष रविंद्र मोरे, चिटणीस आर. डी. साळवी, शाखा क्र. ६ माणगांव शहर अध्यक्ष निलेश साळवी, शाखा क्र. १ अध्यक्ष - प्रशांत गायकवाड, कोषाध्यक्ष रुपेश जाधव, माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समिती माणगांवचे सरचिटणीस तथा प्रज्ञा विकास बौद्धजन मंडळाचे सभासद तथा ज्येष्ठ मार्गदर्शक, सरचिटणीस आयु. अरविंद मोरे गुरुजी, उपाध्यक्ष आयु. महेंद्र पवार, प्रज्ञा विकास बौध्दजन मंडळाचे तथा शहर शाखा क्र. 06 चे खजिनदार तथा ज्येष्ठ मार्गदर्शक आयु.झांगरजी सुखदेवे, आयु कांबळे, आयु. स्वप्निल गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे शहर शाखेचे सन्मा अध्यक्ष आयु. निलेश साळवी गुरुजी यांनी शाब्दिक सुमनाने स्वागत केले.
माणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सागर कावळे साहेब यांचे शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तसेच प्र .वि. बौ. मंडळाचे ज्येष्ठ सभासद आयु. कांबळे यांचे शुभहस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तद्नंतर धम्मवंदना व भिमस्तुती गाथा घेण्यात आली.
नंतर उपस्थित मान्यवरांनी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या तसेच बुध्द मुर्तिस, क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामुदायीक पंचांग प्रणाम करून सरणेतेय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.