अन्न सुरक्षा योजने अंतर्गत तळा येथे मोफत अन्न धान्य वाटप सुरु

तळा (संजय रिकामे) : राज्य सरकारने कोविड १९ च्या काळात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वांना मोफत अन्न धान्य वाटप करण्याचे आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिले आहेत या काळात तांदूळ ३ व गहू २ किलो मोफत वाटपाचे आदेशाचे पालन पुरवठा खात्यामार्फत तळा रास्त भाव धान्य दुकान नं १ व २ मध्ये दि.१२ मे.२१ पासून सुरू करण्यात आले आहे. हि योजना १ मे पासून कार्यान्वित करण्यात आली होती पंरतु कोरोना काळात बायोमेट्रिक मशीन वर ग्राहकाचा थम्स घेण्यात येऊ नये अशी परवानगी शासनाकडून मिळावी यासाठी राज्यभर मागणी करण्यात येऊन शासनाने थम्स घेण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आल्यानंतर संघटनेने निर्णय घेऊन तालुक्यातून धान्य उचलून वाटप सुरु झाले आहे. मागील वर्षाप्रमाणे या काळात जनसेवा समजून ना नफा ना तोटा या तत्वावर रेशनदुकानदार आपले चोख कर्तव्य पार पाडीत आहेत.या कालावधीत सर्वांना धान्य वाटप केले जाणार आहे. तरी याची नोंद घ्यावी असे कळवीले आहे.

प्रमोद घोसाळकर, रायगड जिल्हा अध्यक्ष : रास्त भाव धान्य दुकानदार संघटना

शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात रास्त भाव धान्य दुकानदारांनी मोफत धान्य वाटप सूरू केले आहे. या काळात धान्य मिळेल. आमच्या मागणी प्रमाणे शासनाने थम्स मशीन घेण्यात येऊ नये. अशी परवानगी दिली असल्याने वाटप सूरू करण्यात आले आहे. या काळात शासनाकडे आमचे काही महीने प्रलंबित कमीशन पेंडींग आहे. ते आमच्या हक्काचे असून मिळेलच परंतु हि वेळ शासनाला कोंडीत पकडण्याची असून देखील या काळात सर्वांना धान्य मिळावे या उदात्त भावनेने शासनाला आम्ही सहकार्य करीत आहोत. 

Popular posts from this blog