पाटणूसच्या तीनही आदिवासी वाड्यांमध्ये कोरोनाची बाधा नाही! 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस पंचक्रोशीत तीन आदिवासी वाड्या आहेत.  फणशीदांड, भिरा आदिवासीवाडी व पाटणूस आदिवासीवाडी.

या तीनही वाड्यांमध्ये लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुठल्याही माणसांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी प्रतिकार शक्ती! ही प्रतिकार शक्ती वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे शारीरिक श्रम, जंगलातील विविध वनस्पती यांचे सेवन, जंगलातील फळे खाणे आणि प्रखर उन्हाची तमा न बाळगता काम करणे श्रम करणे. दिवसभर श्रम केल्यानंतर गावठी प्राशन करून मनसोक्त झोप काढणे. ते उद्याची चिन्ता कधीच करीत नाहीत. आज पोटभर जेवलो ना, उद्याचे उद्या बघू. या त्यांच्या सवयी मुळे त्यांना कोणतेही आजार जडत नाहीत. डायबेटिज, ब्लड प्रेशर किंवा अन्य गंभीर आजार यांना माहीतच नाही. त्यामुळे यांना शक्यतो दवाखान्याची पायरीच चढावी लागत नाही. सर्व सामान्य माणसांच्या घरात अनेक सुखसोई असतात मिळत नाही ते निसर्गाचे सानिध्य त्यामुळे शसरात नागरिकांना कोरोनाशी दोन हात करावे लागत आहेत. खेड्या पाड्यातही लोकांनी सुखसोयींनी युक्त अशी सुसज्ज घरे बांधून ते शहरासारखे जीवन जगत आहेत त्यामुळे खेड्यां मधेही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे खेड्यातील माणसांनीही योग्य ती काळजी घेतल्यास कोरोनापासून बचाव होऊ शकतो असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Popular posts from this blog