लसीकरण करण्यासाठी गोरेगाव-सिलीमचे वैद्यकीय उपकेंद्र तातडीने सुरु करा : महेश सावर्डेकर यांची मागणी
रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्हातील माणगांव तालुक्यामधील मांजरोने विभागातील सिलीम गाव येथे वैद्यकीय उपकेंद्र २००६ मध्ये बांधण्यात आले आहे. तेव्हापासून हे वैद्यकीय उपकेंद्र बंद आहे. चक्रीवादळ आल्यानंतर या वैद्यकीय उपकेंद्राचे सुशोभीकरण करण्यात आले इतकं करूनही लाखो रुपये खर्च करून सुद्धा जर वैद्यकीय उपकेंद्र सुरु नसेल तर याचा फायदा काय? असा प्रश्न म.न.वि.से माणगांव तालुका उपाध्यक्ष महेश सावर्डेकर व त्यांच्या सहकार्यांनी उपस्थित केला. आजुबाजुच्या १४ गावांना उपचारासाठी १२ ते १५ किलोमीटर दूर जावे लागते. त्यामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कोरोना या घातक विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. व यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात लसीकरण करत आहे परंतु हॉस्पिटल जवळ असूनही लोकांना लस घेण्यासाठी गाडी प्रवास बंद असूनदेखील खाजगी वाहनाला माफक पैसे देऊन १२ ते १५ किलोमीटर दूर जावे लागत असेल तर एवढं मोठं उपकेंद्र बांधण्याचा अट्टहास कशासाठी?असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
लसीकरणासाठी तसेच नियमित उपचारासाठी हे वैद्यकीय उपकेंद्र चालू करावे यासाठी म.न.वि.से. माणगांव तालुका उपाध्यक्ष महेश सावर्डेकर व जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ पवार, तालुका अध्यक्ष वृषभ वातेरे, गोरेगाव विभाग अध्यक्ष रोहन कांबळे, सिलिम शाखा अध्यक्ष प्रमोद घोले, महाराष्ट्र सैनिक राजेश महाडिक, अमोल पवार, प्रतीक तटकरे, सोहिल महाडीक आदी मनसैनिक आक्रमक झाले आहेत व तसे निवेदन पंचायत समिती माणगांव, आरोग्य विभाग व प्रांत कार्यालय येथे देण्यात आले आहे तरी हॉस्पिटल लवकरच चालू होईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.