आरे बुद्रूक ग्रा. पं चे ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांच्यावर दप्तर दिरंगाईबद्दल कारवाईची मागणी

रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील कुंभोशी येथील अकनाथ अंबाजी मळेकर यांनी विविध विकासकामे व अन्य विषयांवर आरे बुद्रूक ग्रामपंचायतीकडून माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता. हा अर्ज दिल्यानंतर त्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई होणे आवश्यक होते. परंतु तशी कारवाई झाली नाही. तसेच नियम ७(१) नुसार निर्धारित कालावधीत उत्तरवादी यांनी माहिती उपलब्ध करून द्यायची असते. परंतु यामध्ये कसूर केला असून नियम ७(६) नुसार अपीलार्थी यांना मोफत माहिती पुरविणे बंधनकारक होते, तेथेही उत्तरवादी यांनी उल्लंघन केल्याने अपीलार्थी यांनी अधिनियम २००५ चे कलम १९(१) नुसार दि. ७ नोव्हेंबर २०२० रोजी प्रथम अपील दाखल केले होते. त्यानुसार प्रथम अपीलीय अधिकारी यांनी जनमाहिती अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांना माहिती देण्याबाबत पत्र क्र. २३२/२०२१ हे पाठविले असताना देखील ग्रामसेवक यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व संबंधित माहिती दिली नाही. म्हणून अपिलार्थी यांनी राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठ - कोकण भवन यांच्याकडे ११ फेब्रुवारी २०२१ रोजी माहितीचा अधिकारांतर्गत दुसरे अपील पारित केले आहे. तसेच याव्यतिरीक्त मुख्यमंत्री, राज्यपाल, नगरविकास मंत्री, पालकमंत्री (रायगड), जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, रा.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog