तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

- निसर्ग चक्रीवादळाच्या अनुभवाने श्रीवर्धनकर तोक्तेमुळे भयभीत

- सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे पोलीसांचे आवाहन

- अफवा पसरविणाऱ्यांवर पोलीसांची करडी नजर

- आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा सज्ज

बोर्लीपंचतन (मुजफ्फर अलवारे) : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पटट्याचे आता चक्रीवादळामध्ये रूपांतर झालेले असून या तोक्ते चक्रीवादळाची पुढची वाटचाल पहाता कोकण किनारपट्टी वर त्याचा प्रभाव जाणवणार आहे यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे यास्तव श्रीवर्धन मध्ये देखील प्रशासन पूर्ण पणे सज्ज झाले असून दिघी सागरी पोलिस ठाणे, श्रीवर्धन पोलीस ठाणे, महसूल विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बामधकाम विभाग एकत्रपणे यासाठी सज्ज झाले असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीनुसार त्यासाठी लागणारे साहित्य यांची नियोजन बद्ध तयारी करणयात आली असल्याचे तहसीलदार सचिन गोसावी यानी संगितले तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अधिकृत महितीशिवाय कोणत्याही अफवा पसरविणाऱ्या माहितींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन दिघी सांगती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण यांनी केले आहे. 

निसर्ग चक्रीवादळा ला काही दिवसांमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल त्याआधीच आता पुन्हा तोक्ते चक्रीवादळाचे सावट घोंगावत आहे.  मागील वेळेस आलेल्या निस्टग चक्रीवादळाचे मुख्य केंद्र बिंदू हे हरिहरेश्वर- श्रीवर्धन असल्याने श्रीवर्धन तालुक्याला याचा मोठा फटका बसला होता. आता येऊ घातलेल्या तोक्ते वादळाची तिव्रता ही निसर्ग चक्रीवाडळापेक्षा कमीच असणार आहे, तरी देखील श्रीवर्धन पर्यायाने रायगड जिल्हयाला चक्रीवादळाला तोंड कसे द्यायचे याचा अनुभव मागील वर्षीच प्रशासनाने गाठीशी बांधला असल्याने या चक्रीवादळातून जर नुकसान झालेच तर दळणवळण पटापट सुरु करण्यसाठी सनपुटन यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवली आहे यासाठी झाडे बाजूला करण्यासाठी प्रत्येक मुख्य मार्गांवर जेसीबी, रस्त्यावर पडलेली झाडे तोडण्यासाठी कापण्यासाठी कटर्स या मुख्य साहित्यासह नारीकानाबकोणत्याहि  प्रकारे मदत करण्यासाठी यंत्रणा सज्ज असणार आहे. मासेमारी करणाऱ्या तालुक्यातील बहुतांश बोटी किनाऱ्याला पोहचल्या असलायचे समजते. दिघी सागरी पोलीस ठाणे देखील पोलिस मित्रबव इतर पथकाच्या मदतीने सज्ज आहे. नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून आपले पशुधन, पशुखाद्य देखील सोयीच्या सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना करण्यात आलूल्या आहेत. वीज व्यवस्था बंद पडल्यास आवश्यक साधने जपून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चक्रीवादळा बाबत नागरिकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचना यांचेच पालन करावयाचे आहे व  अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे यामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पोमाण यांनी दिले आहेत. तर प्रत्येक ग्रामपंचायत यासाठी प्रशासन देत असलेल्या वेळोवेळीच्या सूचनांचे पालन करीत आहेत. श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी श्री. शेडगे यांच्या मार्गदर्शनानुसार, तहसीलदार सचिन गोसावी त्याचप्रमाणे सार्वजनिक विभाग, विज वितरण विभाग, पंचायत समिती विभाग, पोलीस खाते, कृषी खाते यांच्या संयुक्तपणे चक्रीवादळासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र आहे.

Popular posts from this blog