पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून देवकान्हे आरोग्य उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली
रोहा (रविना मालुसरे) : रोहा तालुक्यांतील ग्रामीण भागापैकी मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या देवकान्हे गावात मागील अनेक वर्षे आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित होता. येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची ग्रामस्थांनी पालकमंत्यांकडे मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर देवकान्हे, ता. रोहा येथील गट नं.270, एकूण क्षेत्र 0.25.0 हे.आर. इतके क्षेत्र, ग्रुप ग्रामपंचायत चिल्हे/देवकान्हे यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन मिळकती भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने कब्जा हक्काने जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड-अलिबाग यांच्याकडे मौजे देवकान्हे, ता.रोहा येथील नवीन आरोग्य उपकेंद्राकरिता पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल देवकान्हे ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे.