वरसे अनधिकृत बांधकामांना जबाबदार नेमके कोण? जनता, प्रशासन की राजकिय पुढारी!

रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपचतमध्ये सध्या डाळ भाताचे रूपांतर चिकन बिर्याणीत करून मनमुराद स्वाद घेऊन संबंधित प्रशासन डकार मारून स्वता:च माझेच डाळ भात, चिकन बिर्याणी म्हणत पण बिर्याणीतील चिकनचे हाडके मत्र आमची नाहीत असे मत ठामपणे काही लोकांनी मांडले. पण त्यांनी बांधकाम बांधणारी कोणाची माणसे आहेत? हे का सर्वांच्या समोर सागितले नाही. वरसे ग्रामपंचायतमध्ये सरकारी जागेवर, खाजगी जागेवर आणि नाल्यावर बिल्डर्सनी अतिक्रमण केलेले आहे. बांधकाम तोडण्यासाठी संबंधित प्रशासनाने कार्यवाही करावी. तर काही कालांतराने भुवनेश्वर कालव्याच्या झोपडपट्टीचे रुमही तुटणार. सामान्य नागरिकाचा प्रेमाने गोड बोलुन काटा काढणार आणि त्यांना बेघर व्हावे लागणार हेही सत्य आहे! तर गेल्या वर्षी पाटबंधारे विभागाने नोटीसा बजावल्या होत्या. कार्यवाही झालीच नाही पण भुवनेश्वर झोपडपटट्टीला अजून काहीच भेटले नाही सर्व नागरिकाचे संसार उध्वस्त करुन पैशाच्या जीवावर सर्व बिनधास्त आहेत? वा रे वा? आताही तेच होणार का?खरे गुन्हेगार मोकाट का? गुन्हेगार फक्त नि फक्त सामान्य नागरिक आहेत का? रूम विकत घेतले म्हणून का? वा रे प्रशासन! ज्या वेळी बांधकाम चालू होते त्यावेळी सर्व गप्प होते सर्वांना डाळ भाताची चिकन बिर्याणी मिळत होत.  हे चिकन बिर्याणी खाणारे कोण? त्यांच्यावर कार्यवाही का नाही? अगोदर कार्यवाही ही ज्या वेळी सरकारी जागेवर आणि खाजगी जागेवर अनधिकृत बाधकाम झाले त्यावेळी जे शासकीय प्रशासकीय अधिकारी होते लोकप्रतिनीधी होते, बिल्डर होते, जे भुमाफिया होते, त्यांच्यावर कार्यवाही ही झालीच पाहिजे आणि त्याच्यावर कार्यवाही करुन सामान्यांचे पैसे वापस द्यावेत किंवा त्याच्या पुनर्वसन करावे असे म्हणणे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र चव्हाण यानी म्हटले आहे.  

तसेच, हे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे व ग्राहकांनी देखील येथील बांधकामे खरेदी करताना सावधानता बाळगावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष बामुगडे, काशिनाथ बामुगडे यांनी केले आहे.

Popular posts from this blog