कुडा बौद्धवाडीतील युवकाची गळफास लाऊन आत्महत्या
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील कुडा बौद्धवाडी येथील निलेश रधुनाथ गायकवाड (वय ४१) याने रागाच्या भरात दारूच्या नशेत राठीची पाखर जंगल भागात झाडाला दोरीने फास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तळा पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पत्नीकडे दारूसाठी पैशाची मागणी केली असता तिने नकार दिला होता. तो राग मनात धरून तीन दिवसापासून २५ मे रात्री ८.३० पासून २८ मे दुपारी ३.४५ पर्यंत बेपत्ता झाला होता. सदर इसमाचा तपास करीत असता त्याने आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. आ.मृत्यू र.नं. ३/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली जवादे व शिवराज खराडे पुढील तपास करीत आहेत.