पाटणूस येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ 

४५ वर्षांवरील नागरिकांनाच लाभ घेता येणार 

सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील (शिरवलीचे उपकेंद्र) पाटणूस येथे रविवार दि. २३ मे रोजी कोविड लासिकरणास प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी ५० नागरिकांनी याचा लाभ घेतला. ४५ वर्षांवरील नागरिकांनाच याचा लाभ मिळणार असूनही नागरिकांनी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. परंतु पहिल्याच दिवशी केवळ ५० लस चे इंजेकशन उपलब्ध झाल्याने ५० नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियमांचे पालन करीत लस घेतली. पाटणूसच्या सरपंच निलीमा निगडे, उपसरपंच चंद्रकांत गुजर व सर्व सदस्य यांच्या प्रयत्नांनी पाटणूस आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्राधान्य मिळाल्याचे सरपंच निलीमा निगडे यांनी सांगितले. 

नागरिकांची रजिस्टर नोंद करण्याचे काम रा.जि.प. शिक्षक प्रवीण राठोड, राजेश जाधव, दिगंबर खटके यांनी पहिले तर डेटा ऑपरेटर पूनम सालेकर, ग्रामपंचायत लिपिक शुभांगी दळवी, सुवर्णा चव्हाण व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी लसीकरणाची तयारी करण्यास उत्तम सहकार्य केले. नर्स ज्योती जाधव, मेडिकल अधिकारी ऋषिकेश केलास्कर, आशा वर्कर रेश्मा म्हामुणकर, शारदा म्हामुणकर यांनी लसीकरणाचे काम पाहिले. 

ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी सरपंच निलीमा निगडे, उपसरपंच चंद्रकांत गुजर, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा कमलेश चव्हाण व इतर सदस्य तसेच माणगाव तालुक्याचे माजी उपसभापती आप्पा म्हामुणकर, माजी सरपंच विजय म्हामुणकर उपस्थित होते. लस घेण्याचा पहिला मान पाटणूस चे ग्रामस्थ राजेंद्र म्हामुणकर यांना मिळाला. लस आणण्यासाठी साठी ऍम्ब्युलन्स ची सुविधा व वैद्यकीय स्टाफसाठी नाश्टा व जेवणाची सुविधा टाटा पॉवर भिरा यांच्या वतीने करण्यात आली होती.

Popular posts from this blog