रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली धाटाव क्रिडासंकुलची पाहणी
रोहा (रविना मालुसरे) : तौत्के चक्रिवादळाचा फटका कोकणाला मोठ्या प्रमाणात बसला,रोह्याची क्रिडा पंढरी म्हणून विख्यात असलेल्या धाटाव येथील क्रिडा संकुलाचे वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
ह्या घटनेची दखल घेऊन रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी आज शनिवार दिनांक २२ मे रोजी धाटाव क्रिडा संकुलला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.उपस्थित अधिकारी वर्गाला तातडीने क्रिडा संकुल दुरुस्तीचे आदेश दिले.
यावेळी पालकमंत्र्यांसमवेत विनोदभाऊ पाशिलकर, विजयराव मोरे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, बॅडमिंटन असोसिएशनचे तालुका अध्यक्ष संतोष भोईर, रोहिदास पाशिलकर, प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी वा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी अधिकारी वर्गाबरोबर सविस्तर चर्चा करुन क्रिडासंकुलची दुरुस्ती व अन्य सुविधांची उपलब्धता करण्याबाबत सुचना केल्या. त्यानंतर आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे सानेगांव हायस्कुलची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्या.