पोलीस बांधवांना मास्क व सॅनिटायझर वाटप 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : संपूर्ण देशात, राज्यात, तालुक्यात आणि खेड्या-पाड्यांमध्येही कोरोनाची दहशत पसरली आहे. असे असतानाही पोलीसांना आपला जीव धोक्यात घालून ऑफिसात किंवा घरात बसून न राहता जनसामान्यांत किंवा रस्त्यामध्ये कुठेही थांबून ड्युटी करावी लागते. त्यामुळे नकळत काही पोलीस बांधवाना कोरोनाची बाधा होते. प्रसंगी कित्येक पोलीस कोरोनाग्रस्त होऊन अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. 

पोलीस बांधवांच्या या महान कार्याची दखल अनेक सेवाभावी संस्था घेतात व आपापल्या परीने वस्तू रूपाने काही जीवनावश्यक वस्तू पोलीसांना प्रेमाचे प्रतीक म्हणून देत असतात.  

रोहा तालुक्यातील क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड या कंपनीने देखील कोरोनाच्या लढाईत महान कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत रोहा येथील पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचार्यांना कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. 

या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र शेगडे यांच्यासह रोहा पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. क्रेडिट ऍक्सेस गामीण लिमिटेडचे डिव्हिजनल मॅनेजर वैभव धर्मे, एरिया मॅनेजर राम माने, ब्रँच मॅनेजर योगेश बोदडे यांनी सदर वस्तूंचे वाटप केले.

Comments

Popular posts from this blog